मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये सौरभ तिवारी तर मुलींमध्ये रिमा धोतरे प्रथम

100
  • मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्यांचे केले अभिनंदन

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्यावतीने विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण

 

मॅरेथॉन स्पर्धेला यशस्वी करणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे व क्रीडा विभागाच्या अधिकारी व शिक्षकांचे मानले आभार

 

मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीसह नागपूर चंद्रपूरचे युवा खेळाडूंचा उत्साही सहभाग

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

दिनांक ९ ऑगस्ट गडचिरोली

 

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आमदार डॉक्टर देवरावजी होळी व मित्र परिवाराच्या वतीने गडचिरोली येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये मुलांमधून नागपूरच्या सौरभ अशोक तिवारी प्रथम तर मुलींमधून रिमा राजेश धोतरे नागपूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी विजेत्यांना रोख रकमेसह शील्ड व प्रमाणपत्र देऊन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते गौरविण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बक्षीस वितरणाच्या प्रसंगी अभिनंदन केले.*

 

*मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गडचिरोलीसह चंद्रपूर ,नागपूर येथील मुला मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी मुलांमध्ये द्वितीय क्रमांक राजन यादव तृतीय गौरव खोडतकर , चौथे नागेश्वर रस्से , पाचवे लोमेश शेंडे तर राहुल हरीनखेडे यांनी सहावा क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये द्वितीय आरती भगत, तृतीय आचल कुडुकर, चौथे अंजली मडावी, पाचवी तेजस्विनी कांबळे, सहावी पायल मांदाडे यांनी क्रमांक पटकाविला. यावेळी लक्ष वेधून घेणाऱ्या सहभागी लहान मुलांना यावेळी प्रोत्साहन पर बक्षीसही देण्यात आले*

 

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराचे व क्रीडा विभागाच्या अधिकारी व शिक्षकांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आभार मानले