ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १९ : एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथे लॉयडस् काली अम्माल मेमोरियल हॉस्पीटलतर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार १९ जानेवारी आणि सोमवार २० जानेवारी २०२५ सकाळी ९. ते सायंकाळी ४ वाजतादरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन पोलिस स्टेशन समोर आलदंडी येथे करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, त्वचा आजारावर, हाडांचे विकार, कान, नाक व घसा तपासणी समस्यांचे त्वरीत निदान, मुलांसाठी आरोग्य सेवा, महिला आरोग्यासाठी विशेष तपासणी, सल्ले, आजारांवर तज्ज्ञांची, मदत इतर चाचण्या, ECO चाचणी करण्यात येत आहे. लाॅयड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करून १९ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.यावेळी भास्कर, साई कुमार, अरुण रावत, कर्नल विक्रम मेहता, सुनिता मेहता, रोहित, भोलूभाऊ सोमनानी, संजय चांगलानी, तोडसाच्या सरपंच वनिता कोरामी, आलदंडीचे पाटील महेश मट्टामी, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी चैतन्य कदम, पोलिस उपनिरीक्षक कुंभारे, डॉ. रॉय, डॉ.0 फारुख, एटापल्ली पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन नल्लावार, तालुक्यातील पत्रकार, परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल लाॅयड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत.
——————————









