Home Gadchiroli खुशखबर!!! अर्थसंकल्पात जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले ५०० कोटी

खुशखबर!!! अर्थसंकल्पात जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मिळाले ५०० कोटी

191

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

गडचिरोली, ता. १२ : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनीक यांनी नुकत्याच झालेल्या गडचिरोली दौऱ्यात यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित करत निधी मंजुरीची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता हे रस्ते लवकरच विकसित होणार आहेत.चंद्रपूर-लोहरा-घंटाचौकी-मुल-हरणघाट-चामोर्शी-घोट-मुलचेरा-अहेरी-वेंकटरापूर-बेजूरपल्ली ते MSH ९ (राज्यमार्ग ३७०) रस्त्याचे मजबुतीकरणासाठी २०० कोटी, मुधोली-लक्ष्मणपूर-येनापूर-सुभाषग्राम रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ११५ कोटी, परवा-केळापूर-वणी-वरुड-नागभीड-ब्रह्मपुरी-वडसा-कुरखेडा-कोरची ते राज्य सीमा (राज्यमार्ग ३१४) रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ९४ कोटी ९१ लाख याशिवाय राज्यमार्ग३८० वर पूल बांधकामासाठी ९५ ते ११४ किमी (ता. एटापल्ली) दरम्यान २७ कोटी, ११०/२०० किमी (ता. एटापल्ली) दरम्यान पूल बांधकामासाठी ५५ कोटी, MSH-८ ते कमलापूर-दामरंचा-मन्नेराजाराम-ताडगाव-कांडोली रस्त्यावर बांडिया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकामासाठी ३ कोटी, MDR-२३ वर लंबीया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकामासाठी २ कोटी ५९ लाख, झिंगानूर-वादाडेली-येडसिली-कल्लेड-कोंजेड-डेचाळी रस्त्यावर येडरंगा वेगू नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री, सहपालक मंत्री यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या या निधीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पूल प्रकल्पांना गती मिळणार असून स्थानिक नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. तसेच, वाहतूक सोयीस्कर होणार असून नक्षलग्रस्त भागातील विकासालाही चालना मिळेल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

—————————————