ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २ : येथील एम. पी. ट्रॅक्टर्सचे संचालक मनोज टेंभुर्ण यांच्यातर्फे अंतरंग योगा क्लबमध्ये योगसाधना करत असलेल्या महिलांना योगा ड्रेस भेट देण्यात आला. 
अंतरंग योगा क्लबमध्ये १ मे महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून योगा टीशर्ट, लोअर वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत स्थानिक शासकीय विज्ञान महाविद्यालयातील बंदीस्त हॉलमध्ये योगासन, प्राणायाम, ध्यान, चेअर योगा, रिक्रेशन गेम, झुम्बा, एरोबीक, गेस्ट लेक्चर आदी उपक्रम चालतात. यामध्ये जवळपास ५० महिलांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांनी नुकतेच १२० दिवसांचा बेसिक योगा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. योग शिक्षक डॉ. अनिल निकोडे यांच्या मार्गदर्शनात हे योगाचे वर्ग घेतले जातात. अंतरंग योगामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



—————————–










