Home Gadchiroli गडचिरोली पोलिसांची श्वान साराची सुवर्णपदकावर मोहर

गडचिरोली पोलिसांची श्वान साराची सुवर्णपदकावर मोहर

106

गडचिरोली, ता. २३ : पुणे येथे १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात झालेल्या स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलातील श्वान सारा हिने सुवर्णपदक पटकावले.

पोलिसांनी आपले गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा या मेळाव्या मागील उद्देश असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धेमध्ये एकूण २५ वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. पुणे येथे आयोजीत २० व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अॅन्टी सॅबोटेज चेक, श्वान पथक आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धेमध्ये लेखी, तोंडी परीक्षेबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षाही घेण्यात आली. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत परीक्षण करण्यात आले. पाच दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये गडचिरोली पोलिस दलातील श्वान सारा हिने श्वान पथक स्पर्धेमधील गुन्हे शोधक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच नागपूर येथे होणा­ऱ्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील श्वान स्पर्धेकरिता महाराष्ट्रातून तिची निवड झाली आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी श्वान पथक, गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश बोरेवार, पदक प्राप्त श्वान सारा, श्वान हस्तक पोलिस हवालदार राजेंद्र कौशिक, अर्जुन परकीवार यांचे अभिनंदन करत भविष्यात अशीच कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

————————————————