मैक्स हॉस्पिटल, नागपूरकडून गडचिरोलीत विशेष ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंट ओपीडी सेवा सुरू

202

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.१४ : मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरने गडचिरोलीतील रुग्णांसाठी विशेष ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट ओपीडी सेवा सुरू केल्याची घोषणा आज करण्यात आली. ही सेवा यशोदा मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर, आशिर्वाद नगर, गडचिरोली येथे उपलब्ध राहणार आहे. या ओपीडी सेवांचा शुभारंभ डॉ. प्रशिक शेंडे, असोसिएट कन्सल्टंट – ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट, मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 

या नव्या उपक्रमांतर्गत डॉ. प्रशिक शेंडे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत गडचिरोली येथे रुग्णांची तपासणी, प्राथमिक सल्ला तसेच फॉलो-अप उपचारांसाठी उपलब्ध राहणार आहेत. या सेवेमुळे गडचिरोली व परिसरातील रुग्णांना नागपूरपर्यंत प्रवास न करता तज्ज्ञ ऑर्थोपेडिक सल्ला मिळणार आहे.

 

यावेळी बोलताना डॉ. प्रशिक शेंडे म्हणाले, “सतत किंवा तीव्र गुडघे व सांध्यातील वेदना, हालचालींमध्ये कडकपणा, सूज, जळजळ, दैनंदिन कामात येणारा अडथळा किंवा पारंपरिक उपचारांचा अपुरा परिणाम यासारखी सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. या ओपीडीच्या माध्यमातून वेळेत तपासणी, योग्य निदान आणि प्रतिबंधक काळजी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

 

ते पुढे म्हणाले, “रॉबोटिक तंत्रज्ञानामुळे जॉइंट रिप्लेसमेंटसारख्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक आणि रुग्णांसाठी सोयीस्कर झाल्या आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान होणारी दुखापत कमी होते, बरे होण्याचा कालावधी लवकर होतो आणि एकूण उपचार अधिक परिणामकारक ठरतात. गडचिरोली व आसपासच्या भागातील रुग्णांना आता रॉबोटिक सहाय्याने आधुनिक ऑर्थोपेडिक उपचार सहज उपलब्ध होतील.”

 

गडचिरोलीत ही विशेष ओपीडी सेवा सुरू करून मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरने प्रगत आणि दर्जेदार ऑर्थोपेडिक उपचार ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. वेळेवर निदान, प्रतिबंधक काळजी आणि अत्याधुनिक रॉबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट उपचारांद्वारे रुग्ण आणि तज्ज्ञ सेवा यांतील अंतर कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

मैक्स हेल्थकेअर विषयी:

मैक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या आरोग्य सेवा संस्थांपैकी एक असून उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून उच्च दर्जाची रुग्णसेवा देण्यासाठी ओळखली जाते. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या या संस्थेकडे 22 आरोग्य सेवा केंद्रांचे जाळे असून सुमारे ५२०० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. दिल्ली-एनसीआर, लखनऊ, मुंबई, नागपूर, मोहाली, बठिंडा, देहराडून यांसह विविध शहरांमध्ये मैक्स हेल्थकेअरची अत्याधुनिक रुग्णालये कार्यरत आहेत. याशिवाय “मैक्स@होम” अंतर्गत होमकेअर सेवा आणि “मैक्स लॅब्स”द्वारे पॅथॉलॉजी व निदान सेवा देखील पुरवण्यात येतात.