महामानवाला अभिवादन: माजी खासदार डॉ.अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

75
​वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क कार्यालयाबाहेर भव्य ‘शरबत वाटप’ उपक्रमाचे आयोजन
आमदार डाँ. मिलिंद नरोटे यांनीही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

गडचिरोली (Gadchiroli)दि.१४ एप्रिल २०२६

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते व आमदार डाँ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.

सामाजिक बांधिलकीतून शरबत वाटप

सध्या विदर्भात उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन, जयंती उत्सवासाठी शहरात येणाऱ्या अनुयायांना व नागरिकांना थंडावा मिळावा या हेतूने मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांच्या वतीने भव्य ‘शरबत वाटप’ उपक्रमाचे आयोजन गडचिरोलीत चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयासमोर करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, गडचिरोली च्या वतीने हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

विचारांचा वारसा जपणे काळाची गरज:मा.खा. डॉ. अशोकजी नेते

याप्रसंगी अभिवादन करत मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आणि त्यांचे विचार ही आपली खरी संपत्ती आहे. महामानवाच्या जयंतीचा उत्साह साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपणे आणि जनसेवा करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” त्यांनी यावेळी सर्व नागरिकांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रामुख्याने माजी खासदार डॉ. अशोक जी नरोटे, आमदार डाँ.मिलिंद जी नरोटे, नगराध्यक्षा अँड.प्रणोती सागर निंबोरकर, कि.मो.प्र.स. रमेश भुरसे,बांध.सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका योगिता पिपरे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे,जेष्ठ नेते तथा स्वीकृत नगरसेवक सुधाकर येनगंदलवार,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय जी खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन कोडवते,डाँ. चंदा कोडवते, महिला बाल कल्याण सभापती सिमा कन्नमवार, नगरसेवक सागर निंबोरकर,नगरसेविका वर्षा शेडमाके,अर्चना निंबोड, साक्षी बोल्लुवार, शिल्पा गव्हारे,अवंतीताई धंदरे, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर,गजानन येनगंदलवार गोवर्धन चव्हाण, अनिल पोहनकर,विनोद देवोजवार, दिनेश नवघडे,दिपक सातपुते, संजय बारापात्रे,देवाजी लाटकर, प्रा.अरुण उराडे,तसेच या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चामोर्शी रोड परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाचा लाभ घेतला.

जयंतीनिमित्त केवळ उत्सव न साजरा करता, लोकोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल मा.खा. डॉ. अशोकजी नेते आणि आमदार डाँ. मिलिंद नरोटे त्यांच्या चमूचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #Mahamanav #Ambedkar135 #Gadchiroli
#AshokNete #MilindNarote #BJP #SamajikUpakram #SharbatVitaran
#SevaHiSangathan #SocialWork #VidarbhaHeat #PublicService #JanSeva
#BhimJayanti #AmbedkarThoughts #ConstitutionOfIndia #Respect #Tribute
#GadchiroliNews #Nandivedh #LocalNews #MaharashtraNews

 

——————————————