नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकरांचा प्रभाग २ मध्ये स्वच्छता आढावा…

55

नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्या पुढाकारातून प्रभाग क्र. २ मध्ये नाली साफसफाई व स्वच्छता पाहणी

नागरिकांच्या समस्या जाणून तात्काळ उपाययोजनांचे निर्देश

गडचिरोली (Gadchiroli): शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने नगर परिषद गडचिरोलीत स्वच्छता व नाली साफसफाई अभियानाला वेग देत नगराध्यक्ष ॲड. सौ. प्रणोती सागर निंबोरकर यांनी प्रभाग क्र. २ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या सक्रिय आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पाहणी दौऱ्यात नगरसेवक श्री. सागर निंबोरकर, शिक्षण सभापती श्री. हर्षल गेडाम तसेच नगरसेविका सौ. कोमल छत्रपती नैताम उपस्थित होते. मान्यवरांनी परिसरातील नाल्यांची स्थिती, साचलेला कचरा आणि स्वच्छतेची पातळी यांची सखोल तपासणी करत विविध भागांना भेट दिली.

पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि पावसाळ्यापूर्वी निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी याबाबत नागरिकांनी आपली मते मांडली. या समस्यांची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नाली साफसफाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच कामात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नाल्यांची योग्य साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही सामूहिक जबाबदारी आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.”

नगराध्यक्षांच्या या पुढाकारामुळे नाली साफसफाई अभियानाला नवे बळ मिळाले असून पावसाळ्यापूर्वीच समस्यांवर प्रभावी उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती ही प्रभावी आणि लोकाभिमुख असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

 

#गडचिरोली #नगरपरिषद #प्रणोतीनिंबोरकर #स्वच्छताअभियान #नालीसाफसफाई #प्रभाग२ #स्वच्छशहर #स्वच्छभारत #लोकाभिमुखनेतृत्व #नागरिकांच्या_समस्या #तत्काळकारवाई #पावसाळ्याची_तयारी #शहरविकास #स्वच्छतामोहिम #गडचिरोलीन्यूज #स्थानिकबातम्या #जनतेचाआवाज #नंदिवेध #मुळापर्यंत

—————————————————–