बोडदा गावात युवकाची हत्या

166

आरमोरी, ता. १८ : तालुक्यापासून २० किलोमीटर अंतरावर आरमोरी पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बोडदा येथे एका युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आहे. प्रशांत रामदास उरकुडे (वय २४)रा. बोडदा, ता. आरमोरी, असे आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रशांत उरकुडे १७ एप्रिल रोजी रात्री शौचासाठी खेमराज राऊत यांच्या शेताकडे गेला होता. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्याला ठार मारून त्याचा मृतदेह जवळच असलेल्या विजय राऊत यांच्या शेतामध्ये फेकून दिला. ही घटना १८ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच प्रशांतचा भाऊ सुधीर रामदास उरकुडे याने घटनास्थळ गाठले आणि गावातील पोलिस पाटील यांच्या मदतीने आरमोरी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

————————————–