अॅप्पल कंपनीतर्फे धन्वंतरी हॉस्पिटलला आरोग्यविषयक साहित्याची भेट

242

गडचिरोली, ता. ११ : रुग्णसेवेसह समाजसेवेचा वसा जपत असलेल्या डाॅ. अनंत शिवनाथ कुंभारे यांच्या धन्वंतरी हाॅस्पिटलला अॅप्पल इंडिया कंपनीच्या वतीने आणि स्पर्श संस्थेच्या सहकार्याने आरोग्यविषयक यंत्रे व अत्याधुनिक साहित्याची भेट देण्यात आली.

अॅप्पल इंडिया कंपनीतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत दरवर्षी दुर्गम भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा दुर्गम भागांत काम करणारे आशा वर्कर किंवा सामाजिक दायित्व घेऊन गोरगरीब लोकांना कमी पैशात किंवा मोफत उपचार करून सेवा देणारे डॉक्टर व रुग्णालयांना साहित्याचे वाटप करण्यात येते. धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे नेहमी सामाजिक बांधिलकीतून कार्य करण्यात येते. येथे आर्थिक स्थिती खालावलेल्या गोरगरीब लोकांना मोफत उपचार व औषधे दिली जातात . डाॅ. अनंत कुंभारे यांच्या पुढाकाराने भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागांत दरवर्षीआरोग्य शिबिर आयोजित करून मोफत औषधोपचार करण्यात येतो . त्यांच्या या समाजसेवेची दखल घेत त्यांना अधिक सक्षमतेने जनसेवा करता यावी म्हणून स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ ,दिलीप बारसागडे यांनी धन्वंतरी हॉस्पिटलला अॅप्पल कंपनीच्या सर्व साहित्याचे वाटप केले. अॅप्पल इंडिया कंपनीकडून स्पर्श संस्थेला ९० आॅक्सिजन कांसेंटेटर, २५ आॅक्सिमीटर, ३५ इन्फ्रारीड थर्मामीटर वाटपासाठी मिळाले आहे. दुर्गम भागात काम करणारे एटापल्ली आणि भामरागड तालुकामध्ये काम करणारे आशा वर्कर्सना ४५ , किटचेसुद्धा वाटप करण्यात आले. या कार्याला बिंदी इंटरनॅशनल राजस्थान या संस्थेची मदत मिळाली आहे. या सर्व उपकरणाची धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिवनाथ कुंभारे यांना भेट देताना डॉक्टर अनंता कुंभारे , डॉक्टर रुपाली पाटील, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, सचिव रोजा खोब्रागडे, प्रकल्प समाव्यक लुकेस सोमनकर, क्षेत्र समन्वयक वैभव सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते लीना बारेकरमकर,  हॉस्पिटलच्या परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

—————————————-