गडचिरोली जिल्ह्याला पहील्या क्रमांकावर आणणार – देवेंद्रजी फडणविस.
गडचिरोली : दि ,12
आलापल्ली येथे झालेल्या भव्य प्रचारसभेत राजे अम्ब्रीशराव महाराजांनी दणकेबाज आणि अभ्यासपुर्ण भाषणात ७० वर्षात कांग्रेसने गडचिरोली जिल्ह्यावर व देशावर केलेल्या अन्याया बद्दल सांगीतले.देशाला कांग्रेसच्या भ्रष्टाचाराने पोखरुन टाकले होते व काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्याला वर्षानुवर्षे अविकसीत ठेवले होते. देशात विकासाची गंगा मोदीजी पंतप्रधान झाल्यावरच वाहायला लागली.काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला होता परंतु प्रत्यक्षात गरीबांसाठी काहीच केलेले नव्हते मात्र मोदीजींच्या दहा वर्षांच्या काळात देशातील तब्बल २५ कोटी नागरीक दारीद्र्यरेषेच्या वर आले.पालकमंत्री असतांना देवेंद्रजीच्या नेतृत्वात याभागातील दुर्गमभागातील शेकडो बहुप्रतिक्षीत पुल आणि रस्ते झटक्यात बांधण्यात आले होते याची सुध्दा आठवण करुन दिली. फक्त भाजपच्या काळातच या भागाचा विकास झाला त्यामुळे मतदारांनी भाजपलाच मतदान करावे असे आवाहन केले.

राज्याचे ऊपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांनी बोलतांना आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि आत्ता गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे सांगीतले.गडचिरोली जिल्ह्याच्या ऊत्कर्षासाठी लोह प्रकल्प,महामार्ग व इतर कित्येक महत्वाच्या निर्णयांचा पाढा वाचुन दाखविला.ऊद्योगरहीत जिल्हा हे नाव आपला पुसले जात आहे आणि मोठमोठ्या गुंतवणुकी जिल्ह्यात होत आहेत.जिल्ह्यात अजुन गुंतवणुकी याव्या,ऊद्योजक यावे यासाठी विमानतळ ऊभे केले जाणार असल्याची घोषणा केली.या भागातुन भुजल व थल वाहतुक कशी होऊ शकेल यासाठी अभ्यास सुरु असल्याचे सांगितले व प्रसंगी नागपुरचे पालकमंत्री सोडेन पण गडचिरोलीचे पालकत्व सोडणार नाही अशी घोषणा करत गडचिरोली जिल्ह्यावर असलेले प्रेम व्यक्त केले.लवकर हा जिल्हा राज्या पहील्या क्रमांकावर येणार असल्याचे आश्वासन दिले.
देवेंद्रजींनी आपल्या भाषणात *राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी माडलेल्या अभ्यासपुर्ण मुद्द्यांचा ऊल्लेख केला होता हे विशेष.









