भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिराव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न

172
  • गडचिरोली:
  • गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार श्री. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ अहेरी तालुक्यातील जिमलगठ्ठा, देचलीपेठा, रसपल्ली, या गावांमध्ये गाव बैठक घेत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत साधले संवाद.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महिलांना न्याय मिळत असून, गरिबांना विकासाच्या धोरणात आणले जात आहे. २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. ८० कोटी जनतेला ५ किलो रेशन आमचे सरकार नि:शुल्क देत आहे.अजून पुढचे ५ वर्ष मोफत रेशन देण्याची घोषणा मोदीजीनी केली. देशात विकासात्मक धोरणाला सरकार महत्त्व देत आहे. श्री.अशोक नेते यांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राजेंनी यावेळी केले.

 

ग्रामस्थांनी या बैठकांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही अशोक नेते साहेबांशी पाठीशी आहोत असा शब्द यानिमित्ताने सर्व ग्रामस्थांनी दिला.!

प्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित