महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते.

104

मौजा-घोट व सुभाषग्राम – येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची कॉर्नर सभा बैठक.

विजयाचा संकल्प करा व कमळ या चिन्हावर बटन दाबुन विजयी करा..खा.नेते.

खासदार अशोकजी नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न .

गडचिरोली : दि.१५एप्रिल २०२४

(घोट/सुभाषग्राम). आज दि.१५ एप्रिल रोज सोमवारी श्रीकृष्ण राईस मिल , (अधिक्यवार) यांच्या पटांगणात घोट व सुभाषग्राम येथील हरण बिशवास यांच्या आवारात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची सहविचारांची कॉर्नर सभा बैठक महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोकजी नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली.

 

यावेळी खासदार अशोक नेते यांनी कॉर्नर सभेला बोलतांना म्हटले देशात विकासाची दुष्टी ठेवून,देशाच्या प्रगतीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना व ऐतिहासिक निर्णयाचा पार्श्वभूमीवर व प्रधानमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर जागतिक विकासाकडे भारताची वाटचाल आहे.त्यामुळे मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी मी आपल्या पर्यत आलो.अब की बार चार सौ पार करत येणाऱ्या १९ तारखेला कमळ या बोध चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे.असे प्रतिपादन खा.नेते यांनी केले.

 

याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी व शिवसेनेचे ‌नेते राकेश बेलसरे व बंगाली समाज प्रदेश उपाध्यक्ष दिपक हलदार यांनी विजयाचा संकल्प करत कमळ या चिन्हावर मतदान करून बहुमताने विजयी करा असे आवाहन मतदारांना केले.

 

यावेळी प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रभाऊ ओल्लालवार, तालुका शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेशभाऊ बेलसरे,अध्यक्ष आनंदभाऊ भांडेकर, माजी जि. प. सदस्य नामदेवराव सोनटक्के, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशजी बारसागडे, बंगाली समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, अरुणभाऊ हरडे, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, विलासभाऊ उईके, दिपक सातपुते,आकोली ताई विशवास, विधान, वैद्य, तथा घोट व सुभाषग्राम या परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित