बँकेचा बचत गटाचा महिला मेळावा आहे असे सांगुन व्याहाड (खुर्द) येथे केला कांग्रेसचा मेळावा.

203

फसगत – उपस्थित महिलाचा आरोप.

गडचिरोली –

सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे बंकिंग मेळावा आहे असे सांगुन सावली तालुक्यातील सर्व बचत गटाच्या महिलांना गाडयाद्वारे व्याहाड बाजार चौकात जमा करून कांग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचाराचा कांग्रेस महिला मेळावा सांगण्यात आला. त्यामुळे बचत गटाच्या महिला आयोजन व भाषण देणाऱ्या कांग्रेस कार्यकर्त्यावर चिडले व बँकेच्या बचत गटाचा मेळावा आहे म्हणुन चक्क कांग्रेसचा मेळावा घेण्यात आला अशा आरोप उपस्थित महिलांनी आरोप केला. आज दि. १६ एप्रिल ला दुपारी २ वाजता बाजार चौक व्याहाड (खुर्द) येथे कांग्रेस महिला मेळावा पार पडला. कांग्रेसच्या मेळाव्यात अनेक बचत गटाच्या महिला जमा झाल्यात व कांग्रेसच्या प्रमुखांनी कांग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा प्रचारा बाबत सांगण्यात आले व भाजपाच्या उमेदवरांवर टिका करण्यात आली. त्यामुळे भाजपाच्या महिला चिडल्या – आक्षेप घेतला आम्हाला कांग्रेसचा प्रचार करण्याकरीता बोलविले काय ‘ बघतात तर बँकेचा एकही अधिकारी व कर्मचारी मेळाव्यात हजर नव्हते. आम्हाला गाडीने आणुन आमची फसगत केली अश्या ओरडल्या. मत कांग्रेसला किंवा भाजपाच्या उमेद वासरांना देणे हा आमचा स्वतंत्र अधिकार आहे . परंतु अशी आमची फसगत करणे म्हणजे उघडया घागरीवर पाणी टाकणे होय अशी महिलांची कुजबुज होती. तरीही महिलांनी संयम राखून कांग्रेसच्या वक्त्याचे भाषण ऐकले. आमची मते कुणाच्या पारड्यात जातात हा येणारा काळच सांगेल असे बोलुन व तक्रार करून बचत गटाच्या महिला आपापल्या गावी निघुन गेल्यात. मेळाव्याला बचत गटांच्या महिलांची प्रचंड गर्दी होती.