गडचिरोली, ता. २१ : मुंबई येथील अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके तसेच त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक सागर पेंढारकर,रमेश्वर भुतेकर, पोलिस शिपाई विकास कुंडवले यांच्या वतीने स्थानिक वेदांती वृद्धाश्रमात २० एप्रिल रोजा वृद्ध महिलाना फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला वेदांती वृद्धाश्रमाचे प्रकल्प संचालक मिलिंद डोंगरे, समुपदेशक दिनेश चौखे, नैना यावले, समाजसेवक प्रवीण मेश्राम, निकीता मंगाम, प्रिया वाकडे, प्राजक्ता जांभूळकर, सोनाली मेश्राम, सुशीला मडावी, किशोर आरीकर, स्वप्नील कुमरे आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वेदांती वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांशी संवाद साधत त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन देण्यात आले.









