काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात मासिक रक्तदान शिबिर

136

एटापल्ली, ता. २१ : लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या वतीने संचालित काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल येथे लाॅयड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी . प्रभाकरन यांच्या नेतृत्वात लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या वतीने २० एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वत: रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.

शिबिरात लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या वतीने मासिक रक्तदान शिबिरांच्या मालिकेद्वारे समाजकल्याणासाठी आपली वचनबद्धता कायम ठेवत मानवी जीवनासाठी अत्यावश्यक रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे. याच मासिक रक्तदान शिबिराच्या मालिकेत शनिवारी संस्थेने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात लॉयडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः रक्तदान करत रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांच्यापासून प्रेरणा घेऊन लॉयडचे ३४ कार्यकारी अधिकारी व इतर कर्मचारीही रक्तदान करून या उपक्रमात सहभागी झाले. दर महिन्याला घेण्यात येत असलेल्या या शिबिरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण व्यक्तींच्या गरजा पूर्ण होत असून दरमहा किमान ५० युनिट रक्ताची उपलब्धता होत आहे. लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.