ग्लोबल गडचिरोली न्यूज,
चामोर्शी, ता. ९ : आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील अड्याळ ते येनापुर पेट्रोलपंपापर्यंत नालीचे बांधकाम नसल्याने गावामध्ये पाणी शिरते परिणामी गावकरी, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारेअड्याळ-येनापुरवासींनी केली आहे.
यासंदर्भात निवडणूक प्रचारादरम्यान आपण केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून मागणी केली असून त्यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आपली मागणी लवकरच मंजूर होईल, असे आश्वासन आमदारा डाॅ. देवराव होळी यांनी निवेदकांना दिले. यावेळी निवेदन देताना आनंदराव पिदुरकर, सरपंच नीलकंठ निखाडे, दीपक पुछलवार, विनोद जक्कुलवार, दिलीप नेताम, प्रेमानंद गोंगले, प्रदीप निझाडे, किशोर भुसे यांच्यासह व्यापारी, दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.









