विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या शपथविधी ग्रहणाचा गडचिरोलीत आनंदोउसव

113

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी ग्रहणाचा आनंदोत्सव गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डाॅ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात रविवार ९ जून २०२४ रोजी साजरा करण्यात आला.

विश्वगौरव नरेंद् मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली. या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक शपथविधीचा आनंदोत्सव साजरा करण्याकरीता रविवारी सायंकाळी ७: १५ वाजता गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने चामोर्शी येथील लक्ष्मीगेट येथे फटाके फोडून, मिठाई वाटून घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे कोमेरवार, रमेश बारसागडे, साईनाथ बुरांडे, विनोद गौरकार, जयराम चलाख, मोराडे, सतीश भांडेकर, विनोद पेशट्टीवार, अनिल भैसारे, विष्णू ढाली, प्रदीप मंडल, ज्ञानेश्वर कुनघाडकर, भवतोष मिस्त्री, रेवनाथ कुसराम, राजू धोडरे, दिवाकर कोहळे, विलास चरडुके, नीरज रामानुजमवार, विलास कुळमेथे, नरेश अलसावर, गजानन तालपल्लीवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.