ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
चामोर्शी, ता. ११ : केवळरामजी हरडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोंडवाना विद्यापीठाच्या मिनी गोल्फ संघात निवड झाली होती. गोंडवाना विद्यापीठाचा संघ अखिल भारतीय मिनीगोल्फ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी झुणझुनू राजस्थान येथे गेला असता स्ट्रोक या इव्हन्टमध्ये हरडे वाणिज्य महाविद्यालयाच्या गुरुदेव सोमनकर व हिमांशू पेद्दीवार याना रजत पदक तसेच भाग्यलक्ष्मी नैताम व सुदेशना भैसारे यांनी कांस्यपदक प्राप्त केले. मागील वर्षाप्रमाणे यंदाही मिनीगोल्फ स्पर्धेत हरडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रावीण्यप्राप्त करणे संस्थेसाठी अभिमास्पद आहे व भविष्यात मिनी गोल्फ फिल्ड निर्माण करून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा निर्माण करू, असा विश्वाससुद्धा संस्थाध्यक्ष अरुण हरडे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल यशोदीप संस्थेच्या सचिव डॉ स्नेहा हरडे यांनी आनंद व्यक्त केला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयात पारंपरिक खेळासोबत नवीन खेळांना प्रोसाहित करण्याचा मानस क्रीडाप्रशिक्षक डॉ. महेश जोशी यांनी व्यक्त केला.









