दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक अल्पवयीन ठार

129

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा व डोड्डी गावांच्या मधल्या रस्त्यावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. मैनू चैतू बोगामी (वय १७) रा. उडेरा, असे मृताचे नाव आहे.

चैतु बोगामी बुधवार (ता. १२ ) दुपारी २ वाजता दरम्यान उडेरावरून एम. एच. ३३ एक्स ७१५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून डोड्डी या गावाकडे जात होता. त्याचवेळी डोड्डीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक अज्ञात व्यक्तीच्या दुचाकीने मैनुच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मैनू बोगामीचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरून आरोग्य सेवेच्या १०८ रुग्ण वाहिकेतून मैनूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे, घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.