जगदंब फाउंडेशनमुळे वाचले युवकाचे प्राण.

100

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

सिरोंचा, ता. १२ : तालुक्यातील धर्मपुरी गावाजवळ दुचाकी घसरून पडल्याने राजबाबू मेकाला (वय ३५ ) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला वेळीच जगदंब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत करून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे जखमी राजबाबू मेकाला याचे प्राण वाचले आहेत.

राजबाबू मेकाला मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान सिरोंचावरून चिंतलपल्ली गावाकडे स्वतःच्या दुचाकीने जात होता. खराब रस्त्यामुळे अचानक दुचाकी खड्ड्यात जाऊन घसरून पडली. या अपघातात राजबाबू मेकाला खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. जगदंब फाउंडेशनच्या सदस्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी राजबाबू याला फाउंडेशनच्या अम्ब्युलन्स व्यवस्थेने सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जगदंब फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमुळे अपघातग्रस्त राजबाबू मेकाला याला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून पुढील उपचार ग्रामीण रुग्णालयात केले जात आहे. त्यामुळे राजबाबूचे नातेवाइक व नागरिकांनी जगदंब फाउंडेशनचे आभार मानले आहेत.

———————————–