चामोर्शी तालुक्यातील 9 महिला प्रभाग संघाकरिता रु.90.00 लक्ष सभागृह मंजूर केल्याबद्दल केले अभिनंदन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक ८ऑगस्ट २०२४ गडचिरोली
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील (उमेद) महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन्नोती अभियान चामोर्शी तालुक्यातील 9 महिला प्रभाग संघाकरिता रु.90.00 लक्ष चे सभागृह मंजूर केल्याबद्दल महिला प्रभाग संघाच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार करण्यात आला. महिला प्रभाग प्रमुखांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी, तालुका अभियान व्यवस्थापक तुषार एस. कर्णे, जिवन ठाकरे, तालुका व्यवस्थापक भारती पेशट्टीवार, भावना रामटेके, प्रभाग समन्वयक निलेश सिरसान, अरविंद मडावी, हेमंत पित्तुलवार, वैशाली सातपुते, संतूताई घोडे, अनिता सातपुते, शोभा मांडवगडे, विभा मेश्राम, संगिता बुरे, कमला दूधबळे, सुमित्रा सातपुते, वनिला कोसरे, कांचन राय, अनिता हलदर उपस्थित होते.









