Home मराठी २२ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या कुणबी मेळाव्याला मोठ्या संख्येने या

२२ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या कुणबी मेळाव्याला मोठ्या संख्येने या

123

कुणबी समाज व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराचे आवाहन

 

समाजातील गुणवंत विद्यार्थी व  नवनियुक्त कर्मचारी व अधिकारी नियुक्त झालेल्यांचा  सत्कार.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक २१ ऑगस्ट गडचिरोली

 

दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सेलिब्रेशन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे दुपारी २ वाजता कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाज बांधव व डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या १०वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नवनियुक्त झालेले शासकीय कर्मचारी व अधिकारी   यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्याला कुणबी समाजातील वरिष्ठांचे  मार्गदर्शन लाभणार असून त्यांचे मार्गदर्शन समाजाला प्रेरक ठरणार आहे. तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  करण्यात आले आहे.