भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांचा रक्षाबंधन कार्यक्रम.

68

निवाशी मुखबधिर शाळा लांजेडा व इंदीरा गांधी चौकातील ऑटो रिक्षा चालक यांना बांधली राखी.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली:- दि.२१ ऑगष्ट

 

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात निवासी मूकबधिर शाळा लांजेडा व इंदिरा चौकातील ऑटो रिक्षा चालक यांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, जेष्ट कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी,माजी नप सभापती वैष्णवी नैताम,महिला आघाडी तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे,शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे,महामंत्री अर्चना चन्नावार,माजी नगरसेविका बेबीताई चीचघरे,माजी नगरसेविका लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे,स्वाती चंदनखेडे,पुनम हेमके,निता बैस, अर्चना निंबोड,संगीता भडके,पुष्पा करकाडे व भाजपा गडचिरोली जिल्हा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.