Home Gadchiroli नागपूर हिवाळी अधिवेशनात मीटर रीडर्सचे शक्ती प्रदर्शन आंदोलन

नागपूर हिवाळी अधिवेशनात मीटर रीडर्सचे शक्ती प्रदर्शन आंदोलन

249

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : महाराष्ट्रातील मीटर रीडर हे गेल्या २० वर्षांपासून विद्युत महावितरणमध्ये मीटर रिडींगचे काम करत आहेत. पण आता नवीन स्मार्ट मीटरने मीटर रीडर्सवर उपासमारीची पाळी येत आहे. त्या अनुषंगाने मीटर रीडर युनियन नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान शक्ती प्रदर्शन आंदोलन करणार आहे.

१९, २०, २१ डिसेंबर २०२४ हे तीन दिवस मीटर रीडर युनियन उपोषण करणार आहे. तसेच महाराष्ट्रातील २० हजार मीटर रीडर्स नागपुर हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढणार असल्याचे मीटर रीडर युनियनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी सांगितले आहे. स्मार्ट मीटरमुळे २० वर्षांपासून कार्यरत असलेले मीटर रीडर्सवर उपासमारीची पाळी येत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील २० हजार मीटर रीडर्स बेरोजगार होऊ नये, यासाठी शांततेने उपोषण करण्यात येणार आहे. महागाईच्या काळात कुटुंबाचा खर्च वाढत चालला असून प्रचंड बेरोजगारी आहे. त्यामुळे मीटर रीडर्सना बेरोजगार न करता त्यांना योग्य काम देण्यात यावे, या मागणीकरिता उपोषण करण्यात येणार आहे.

——————————————-