ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता. ७ : येथून जवळच असलेल्या बोदली येथील कौशल्या मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना ७ जानेवारी २०२५ रोजी इनरव्हिल क्लबच्या वतीने स्पोर्ट ड्रेस भेटवस्तू सवरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमाला इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष प्रतिभा रामटेके, कोषाध्यक्ष वैशाली गोट्टमवार, आयएसओ पिंकी राठी, उपाध्यक्ष वैशाली बट्टूवार, माजी अध्यक्ष सुधा राठी, माजी आयएसओ मंजू काबरा, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, आयएमसी सदस्य अर्चना नेते तसेच शाळेचे मुख्याध्यापक जोशी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. नवीन ड्रेस मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यांच्यासोबत असणारे काळजीवाहू शिक्षक उपस्थित होते. इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष प्रतिभा रामटेके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिल्पा हेमके यांनी मानले.
—————————–









