विकसित सशक्त आणि समृद्ध भारतासाठी भाजपाचे सदस्य व्हा:- सौ. गीता हिंगे

54

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक :- ८/०१/२०२५

 

गडचिरोली :- विकसित सशक्त आणि समृद्ध भारतासाठी भाजपाचे सदस्य विश्वातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून भारताला विकसित भारत करण्याच्या या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा गडचिरोली शहराच्या वतीने महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी संघटन पर्व अभियानांतर्गत भाजप सदस्यता महाभियानाला सुरुवात करण्यात आली.

 

गडचिरोली शहरातील धानोरा रोडवरील बस स्थानक येथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांच्यासोबत गडचिरोली शहरातील महिला पदाधिकाऱ्यांनी सदस्यता अभियान राबवले.

सर्व महिला कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन जास्तीत जास्त संख्येने भाजपा सदस्य होण्यास जनतेला आव्हान करावे व सहकार्य करून त्यांना भाजपा सदस्य बनवावे असे, आवाहन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी केले.

 

यावेळी महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बेबीताई चीचघरे, माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर, शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे, माजी नगरसेविका लताताई लाटकर,रेखा उईके,पुष्पाताई करकाडे,संगीता राऊत,अंजली देशमुख,कोमल बारसागडे, भावना हजारे व अन्य महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.