सोमवारचा जनता तक्रार दरबार होणार नवीन जनसंपर्क कार्यालयात

110

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

जनसंपर्क कार्यालयाचे पोरेड्डीवार कॉम्प्लेक्स येथून अँड संजय देशमुख यांच्या जुन्या घरी स्थानांतरण

 

तक्रारी सोडवण्यासाठी जनतेला येण्याचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे आवाहन

 

दिनांक २ मार्च २०२५ गडचिरोली

 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे स्थानांतरण पोरेड्डीवार कॉम्प्लेक्स येथून अँड संजय देशमुख यांच्या जुन्या घरी ( चामोर्शी रोड माजी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयाचा मागील परिसर) करण्यात आले असून या सोमवारचा जनता तक्रार दरबार नवीन जनसंपर्क कार्यालयात होणार आहे. करिता येणाऱ्या तक्रारकर्त्यांनी या नवीन कार्यालयात येऊन आपल्या तक्रारी सोडवाव्यात असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.