ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ३ : भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस मंगळवार (ता. १) विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून साजरा करण्यात आला.
सुरूवातीला गडचिरोलीकरांचे आराध्यदैवत सेमाना हनुमान मंदिरात पूजा व आरती केल्यानंतर सेमाना गार्डनमध्ये ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले.
विवेकानंद नगरातील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मुरखळा येथील मूकबधीर विद्यालय आणि बोदली कौशल्य निवासी मतीमंद विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले. महिला व बाल रुग्णालयात ‘माणुसकीचा एक घास’ म्हणून अन्नदान करण्यात आले. तसेच श्री श्री रविशंकर गुरूजी प्रणित आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने स्थानिक सुमानंद सभागृहात आयोजित सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्यात सहभागी होऊन रूद्र पूजेत सहभाग घेतला. यादरम्यान गजानन गेडाम (रा. गोविंदपूर) या रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची डॉ. अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्याचठिकाणी ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने जिल्हा शल् चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके व अतिरिक्त जिल्हा शल् चिकित्सक डाॅ. सतीशकुमार सोळंके यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. दिवसभर डॉ. नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.










