असा आहे आपला गडचिरोली जिल्हा

206

 

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक :- लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अतिप्राचीन दंडकारण्यातील आपला गडचिरोली जिल्हा अतिशय निसर्ग समृद्ध, प्रसन्न, ,शांत आणि इतिहासातही आपले वेगळे स्थान निर्माण करणारा आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आॅगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही दोन ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तालुक्याची ठिकाणे होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४४१२ चौरस किमी.आहे. चंद्रपूर व ब्रह्मपुरीमधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. खरेतर चंद्रपूर जिल्ह्याचा भाग आणि नागपूरच्या जवळ असलेल्लया ब्रह्मपुरी तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरून होती. मात्र ब्रह्मपुरीऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आॅगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली. अर्थात गडचिरोली जिह्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी निकराचा लढा दिला, अनेक आंदोलने केली.गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो. फार प्राचीन काळी या प्रदेशावर राष्ट्रकुटांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य, देवगिरीचे यादवांचेही साम्राज्य होते. त्यानंतर गडचिरोलीच्या गोंड राजांनी या परीसरावर राज्य केले. तेराव्या शतकात खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून आधी चंद्रपुरातील बल्लारशहा आणि नंतर चंद्रपूर येथे हलवली. दीर्घकालीन व वैभवशाली गोंड राजवटीनंतर चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटीशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्रह्मपुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्ररचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आला. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रह्मपुरीऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्हा जवळपास ७६ टक्के जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आश्रय घेतला होता. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल मार्गदर्शनात पोलिस विभागासह सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला आहे.गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगू, बंगाली, छत्तीसगडी अशा अनेक भाषा बोलल्या जातात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने प्रशासकीयदृष्ट्या एकूण सहा उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) निर्माण केले असून प्रत्येक उपविभागात दोन तालुके सामाविष्ट करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात अनेक मोठ्या नद्या आहेत. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी वैनगंगा हिच्यासह गोदावरी, प्राणहिता, पर्लकोटा, पामुलगौतम, टिपागडी, वैलोचना, खोब्रागडी, गाढवी, पोहार, पोटफोडी, दिना, टिपागडी अशा अनेक नद्या जिल्ह्यातून खळाळून वाहतात. विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले श्री क्षेत्र मार्कंडेश्वर यासह भवरागड, अरततोंडी, खोब्रामेंढा, कालेश्वरम, चपराळा

अभयारण्यातील कार्तिकस्वामी महाराजांचे प्रशांतधाम अशी अनेक तीर्थक्षेत्रे या जिल्ह्यात आहेत. झाडापापडा, व्यंकटापूर, कुंकुमेश्वर, बाजागड अशा अनेक ठिकाणी निसर्गाचे चमत्कार बघायला मिळतात.

नक्षलवाद्यांची दहशत, असुविधा, बेरोजगारी, उद्योगांचा अभाव अशा अनेक समस्यांनी हा जिल्हा गांजला होता. पण जिल्ह्यात लाॅयड्स मेटल्स अॅंड एनर्जी लिमीटेडने सुरजागड येथे लोहखाण सुरू केली. येथील लोह खनिजावर आधारीत प्रक्रिया उद्योग कोनसरी येथे सुरू केला. या कोट्यवधींच्या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारोंना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सक्षम नेतृत्वामुळे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या भक्कम पाठींब्यामुळे कधीकाळी राज्यात शेवटी असलेला हा जिल्हा आता प्रथम क्रमांकावर झेप घेत आहे. आतापर्यंत या जिल्ह्यावर खुप अन्याय झाला. पण सिंगम फिल्म प्रमाणे “आली रे आली आता आपली बारी आली.”…आता आपल्याला विकासापासून कोणीच रोखू शकणार नाही. म्हणून जय गडचिरोली, जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जिल्हावासींना गडचिरोली जिल्हा वर्धापनदिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

 

– तिलोत्तमा हाजरा

मुख्य संपादक, ग्लोबल गडचिरोोली न्यूज पोर्टल

———————-