भारतीय परंपरा जपण्यासाठी उत्सव घेणे काळाची गरज : गीता हिंगे

120

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २७ : आपली भारतीय परंपरा ही सण, उत्सवप्रिय आहे. त्यामुळे आपली ही भारतीय परंपरा जपण्याासाठी उत्सावाचे आयोजन काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हा महामंत्री तथा आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता हिंगे यांनी केले.

गडचिरोली शहरातील आशीर्वादनगर येथील तान्हा पोळा उत्सव २५ वर्षाची परंपरा कायम ठेवत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अॅड.विश्वजीत कोवासे, काॅंग्रेस महिला आघाडी अध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, राजेश कात्रटवार,प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते. या तान्हा पोळा उत्सवात हजारोंच्या संख्येत प्रेक्षकांची गर्दी उसळली होती. वेशभूषा आणि नंदी सजावट स्पर्धेत जवळ पास ५०० च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी एकाहून एक असे वेगवेगळ्या वेशभूषेतील स्पर्धक आणि नंदी सजावट प्रेक्षकांना आकर्षून तर घेतच होती पण परीक्षकांची परीक्षण करताना तारांबळ उडाली. रामलल्लाची वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. या कार्यक्रमात आधारविश्व फाऊंडेशनच्याअध्यक्ष गीता हिंगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आशीर्वादनगरतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजप शहर महामंत्री मंगेश रणदिवे यांना वृत्तपत्राचा पुरस्कार मिळाल्याबद्दल,साहिल बारापात्रेची महाराष्ट्र आईस हॉकी टिममध्ये निवड झाल्याबद्दल, वर्षा कऱ्हाडे शिक्षक सहकारी पॅनेलमध्ये निवडून आल्याबद्दल या सर्वांचा आशीर्वादनगरतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना गीता हिंगे म्हणाल्या की, आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि ठिकठिकाणी सत्कार झाले. परंतु आपल्या वाॅर्ड किंवा नगर म्हणजे आपल्या घरच्या लोकांकडून आपला सत्कार हा माझ्यासाठी अतिशय मोलाचा आहे. त्यांनी सर्व बालगोपालांचे कौतुक सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. वेशभूषा स्पर्धेमध्ये ७००१ चे प्रथम बक्षीस गीता सुशील हिंगे यांच्याकडून, द्वितीय बक्षीस ५००१ महेश काबरा यांच्याकडून ,तृतीय बक्षीस ३००१ शालिग्राम विधाते यांच्याकडून, चतुर्थ बक्षीस २००१ आराध्या कॅटरर्स यांच्याकडून तर पाचवे बक्षीस १००१ चे प्रदीप रणदिवे यांचेकडून तसेच नंदी सजावट मध्ये ५००१ प्रथम बक्षीस फारुख शेख यांच्याकडून, द्वितीय बक्षीस ३००१ चे विरेंद्र बोपचे यांच्याकडून, तृतीय बक्षीस २००१ चे सागर हजारेकडून , चतुर्थ बक्षीस १००१ चे रामने यांच्याकडून देण्यात आले तर काही प्रोत्साहनपर बक्षीसेसुद्धा देण्यात आली. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना पाणी बॉटल भेट देण्यात आली. रवी मेश्राम, संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, प्रवीण रक्षमवार या युवकांच्या पुढाकाराने तसेच प्रदीप रणदिवे,गजानन दहीकर, महेश काबरा, सुशील हिंगे ,शिंदे सर, चेतन समर्थ, दिलीप आखाडे , साळवे सर, विजय वाघुलकर, भडके, विधाते, डॉ. नगराळे, हमीद शेख, राजू नेरकर, नरेश पोरेड्डीवार, नारदेलवार, हेमके, रोहित वैष्णवी, कांचन दशमुखे, बेहरे, मुलकलवार यांच्या सहकार्याने आशीर्वादनगरातील तान्हा पोळा अतिशय उत्साहात पार पडला.

————————————–