भाजपा महिला आघाडी गडचिरोलीची “नारी वंदन” नियोजनात्मक बैठक संपन्न
गडचिरोली(Gadchiroli) – दि. 10 एप्रिल : नारीशक्ती वंदन विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या विधेयकामुळे न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार असून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळणार आहे या विधेयकामुळे खरोखरच महिलांचा खरा सन्मान आहे असे प्रतिपादन सौ. आरतीताई वानखेडे नारीशक्ती वंदन गडचिरोली जिल्हा प्रभारी यांनी केले.मा.आमदार श्री.मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशजी बारसागडे यांच्या अध्यक्षतेखाली तर सौ.छायाताई दंडारे विशेष निमंत्रित सदस्य तथा माजि जिल्हाध्यक्ष ग्रामीण अमरावती,सौ.योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका गडचिरोली,सौ. प्रनोतीताई निंबोळकर नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली,सौ,डॉ. चंदाताई कोडवते भाजपा राज्य परिषद सदस्य,सौ.योगिताताई भांडेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली सौ.रोशनीताई वरघंटे तालुकाध्यक्ष गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.
या बैठकीचा मुख्य उद्देश मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णयाचे स्वागत करीत या विधेयकाला समर्थन देण्यासाठी महिला आघाडीच्या वतीने 11 एप्रिल ते 18 एप्रिल यादरम्यान विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीत खालील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
१) भाजपा महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथे पदयात्रा व रॅलीचे आयोजन दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येत आहे.
२)बिल समर्थन मिस कॉल 96 67 17 33 33 या नंबर वर मिस कॉल करणे.
३) सोशल मीडिया वरून प्रत्येक प्लॅटफॉर्म वरुन वायरल करणे.
४) विरोधी पक्षातील महिला नेत्यांची पुष्पगुच्छ देत भेट घेणे व या अधिनियमासाठी समर्थन घेणे.
५) जिल्ह्यातून ५००० पोस्टकार्ड सर्व सामान्य महिला फळ/फुल/ मच्छी विक्रेत्या/लाभार्थी महिला /बचत गट महिला यांचे या बिल संदर्भात धन्यवाद मोदीजी पोस्टकार्ड वर सही घेने.
६)महिला संमेलन घेने.
७)नारीशक्ती दीवार तयार करने.
८) धन्यवाद मोदीजींचे 100 व्हिडिओ बनवून घेणे व त्यांचा प्रसार करणे.
९)नारीशक्ती वंदन अधिनियमाच्या अभिनंदनाचे बॅनर लावणे.
बैठकीला श्रीमती प्रतिभाताई चौधरी ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपा, श्रीमती प्रीतीताई शम्भरकर जिल्हा महामंत्री,सौ.वर्षाताई शेडमाके जिल्हा सचिव, लताताई पुंगाटे महामंत्री,सौ.किरणताई चचाने तालुका अध्यक्ष गडचिरोली,सौ. कविताताई किरणे तालुका अध्यक्ष चामोशी,सौ.सीमाताई कन्नमवार शहर अध्यक्ष गडचिरोली, सौ.अर्चनाताई बोरकुटे जिल्हा महामंत्री, सौ.माधवीताई पेशेट्टीवार उपाध्यक्ष,सौ. शिल्पाताई राय उपाध्यक्ष सौ. रंजनाताई कोडाप जिल्हा सचिव, पल्लवीताई बारापात्रे, सौ. अर्चनाताई ढोरे तालुकाध्यक्ष वडसा ग्रामीण सौ.शिल्पाताई हेमके नगरसेविका,सौ.गुड्डी मारभते नगरसेविका,सौ. कोमलताई नैताम नगरसेविका, सौ. साक्षीताई बोलूवार नगरसेविका,सौ.अर्चनाताई निंबोड नगरसेविका,सौ.लताताई लाटकर माजी नगरसेविका.सौ. अलकाताई पोहनकर माजी नगरसेविका, वैष्णवी नैताम माजी नगरसेविका महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बैठकीचे आयोजन मा.सौ. योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका गडचिरोली यांनी केले, सूत्रसंचालन अर्चनाताई बोरकुटे जिल्हा महामंत्री यांनी केले तर आभार सीमाताई कन्नमवार शहराध्यक्ष यांनी मानले.










