Home Gadchiroli ८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवाडा निमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवाडा निमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

114

ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli), ता. १२ : महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राष्ट्रीय पोषण पंधरवाड्यानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. हा उपक्रम दि. ०१ एप्रिल २०२६ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात येत आहे.
यावर्षीच्या पंधरवड्याचा मुख्य विषय “बालकाच्या जीवनातील पहिल्या ६ वर्षांतील मेंदूचा व बौद्धिक विकास” असा असून, त्याअंतर्गत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदू विकासासाठी पूर्व उद्दीपनाचे महत्त्व, ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळाधारित पूर्व-शालेय शिक्षण, बालकांचा मोबाईल स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक व समुदायाची भूमिका तसेच अंगणवाडी केंद्रे सक्षम करण्यासाठी समुदायाच्या सहभागाची गरज यावर विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती कडू (बालविकास अधिकारी, नागरी प्रकल्प), सिमा कन्नमवार (सभापती, महिला व बालकल्याण), वनिता बाबाळे (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्यासह नगरसेवक सतीश विधाते,नगरसेवक बाळू टेंभुर्णी, अंजली देशमुख तसेच योगशिक्षिका संगीता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी बालकांच्या पोषण, आरोग्य व शिक्षणाबाबत पालकांना मार्गदर्शन करताना लहान वयातील योग्य आहार, संगोपन आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अंगणवाडी सेवांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रमाला यश मिळवून दिले.

#राष्ट्रीय_पोषण_पंधरवाडा
#PoshanAbhiyaan
#NutritionForAll
#HealthyChild
#ChildDevelopment
#EarlyChildhood
#BrainDevelopment
#Anganwadi
#WomenAndChildDevelopment
#HealthAwareness
#BalancedDiet
#HealthyIndia
#FitIndia
#ParentingTips
#SmartParenting
#ScreenFreeChildhood
#EducationMatters
#CommunitySupport
#Gadchiroli
#गडचिरोली
#PublicAwareness
#GovernmentInitiative
#BreakingNews
#LocalNews
#IndiaNews

———————————-