मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. खासदार रामदासजी तडस यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन.

86

महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार मा.रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ,प्रचार दौरा

 

वर्धा लोकसभा क्षेत्रातील तालुका सेलू येथील आकोलि व जामनी येथे बुथ प्रमुख, वारियर्स व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न.

गडचिरोली:-दि.२४ एप्रिल.

देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी दहा वर्षांमध्ये अनेक योजना व ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत.प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात भारत देश विकासाकडे वाटचाल करीत आहे.मा.नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे वर्धा निर्वाचन क्षेत्राचे अधिकृत उमेदवार मा.खासदार रामदासजी तडस यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.असे आवाहन भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले.

वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.खासदार रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील तालुका सेलु येथी आकोली व जामनी येथे भाजपा गडचिरोली जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बुथ प्रमुख,वारियर्स,महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली.यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

बैठकीला जामनी बुथ प्रमुख अवधूत कुकुडकर,बुथ प्रमुख धनराज गव्हारे,महिला बुथ प्रमुख पायल दुधबडे,सुभाष येलोरे,सतीश धोडरे,अनिल येलोरे,प्रतिभाताई कुकुडकर,मालाबाई मोकलकर,माजी सरपंच बेबीबाई भांडेकर,रविंद्र धुर्वे,गुणवंतराव सहारे,मारोतराव भांडेकर,आकोली येथील वारियर्स नरेशभाऊ मुरले,बुथ प्रमुख अरुण चीचघरे,बुथ प्रमुख राहुल दरने,प्रविण सहारे,बुथ प्रमुख,वारियर्स महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.