प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक 9 ऑगस्ट 2024 गडचिरोली
गडचिरोली : आपण ज्या आश्रम शाळा मधून शिक्षण घेत आहात त्याच आदिवासी विकास विभागाच्या वतीने चालणाऱ्या आश्रम शाळेमधून माझे प्राथमिक शिक्षण झाले असून मी सुद्धा आदिवासी आश्रमशाळेचा पूर्व विद्यार्थी असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी मंचावर प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश आर आर पाटील शाळा समिती अध्यक्ष उर्मिला सिडाम, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत भाऊ बोरकुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
यानिमित्त आश्रम शाळांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.









