Home मराठी आदिवासी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी.

आदिवासी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी.

119

चामोर्शी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आ डॉ. देवरावजी होळी यांनी केले उद्घाटन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ९ ऑगस्ट गडचिरोली

 

आपण १० वर्षापासूनच्या आमदारकीच्या काळात आदिवासी समाजा समाजाच्या हितासाठी सातत्याने शासन प्रशासनाशी संघर्ष करीत असून आदिवासी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन तालुका शाखा चामोर्शी तथा सहयोगी विविध आदिवासी संघटना तालुका चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.

 

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनोहर पाटील पोरेटी, एम. बी. कडते, विश्वजीत कोवासे, कुसुमताई आलाम, प्रशांत पोयाम, दादाजी शेडमाके, सचिन मडावी, दिपक आत्राम, राजेश्वर मडावी, दिपक पुंगाटी, गीता परचाके, तथा आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.