वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दि.२१/०८/२०२४
गडचिरोली : बहीण-भावाच्या पवित्र नात्यातील निखळ प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त भाजपा महिला आघाडीतर्फे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील स्थानिक मातोश्री वृद्धाश्रमात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यादरम्यान वृद्ध मंडळींना बिस्किटे, फळे, आणि मिठाई वाटप करून , त्यांच्या सोबत वेळ घालवुन रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी “या जगात आई वडिलांच्या आनंदापेक्षा कुठलाही आनंद महत्वाचा नाही, मग ते अगदी कोणाचेही का असेना,
ज्यांच्या चेहऱ्यावर आपण थोडावेळ का हसू आणू शकलो, म्हणजेच आपण खूप काही मिळवलं, ऐन सणासुदीच्या दिवशी नेमके आपले लोक जवळ हवे असतात, आणि आम्हीही तेच बनण्याचा प्रयत्न करतोय, असे प्रतिपादन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांनी केले.
”
निर्मळाहुनी निर्मळ नातं मुक्ताई ज्ञानाचे,
जगी धन्य झाले नाते बहिण भाऊ प्रेमाचे,
जपावे बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळुवार,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताईने”
या ओळी म्हणून गीताताई हिंगे यांनी यावेळी भाऊ बहिणीच्या नात्याचे महत्व सांगितले.
आपल्या भारतात अगदी प्रत्येक राज्यात रक्षाबंधन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असेही त्यांनी यावेळी सांगितले . बहीण – भावाचे स्नेहबंध अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत गीताताई हिंगे यांनी या कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, प्रतिमा सोनवणे, कोमल बारसागडे,भारती खोब्रागडे, वैष्णवी डोंगरे, भूमी कोंडावार तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









