महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांचा दौरा

149

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता..२९ : महिला व बालविकासमंत्री आदिती वरदा सुनील तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत आहेत.

१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे त्यांचे आगमन होईल. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थित राहतील. दुपारी १२.१५ वाजता नवेगाव येथील नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन करून दुपारी १ वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थिती राहतील. दुपारी २ ते ३ ही वेळ राखीव असून दुपारी ३ वाजता त्या गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करतील, असे कळविण्यात आले आहे.

———————————