ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली :दि 2 जून
नुकताच राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या शालांत परीक्षेचा निकाल लागलेला आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत,ध्येय आणि अभ्यासात सातत्यता निर्माण करून बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केली आहे.
अशा बौद्ध समाजातील तसेच जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने दरवर्षी केला जातो.
यावर्षी सुद्धा अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी इयत्ता 10 वी व 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या सर्वसामान्य, एस टी गटातील तसेच बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी10 वीच्या परीक्षेत 90 टक्केच्यावर तसेच इयत्ता 12 वीच्या परीक्षेत 85 टक्केच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची सत्यप्रत जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत( 9075756625) तसेच जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम डांगे( 9422361077) यांच्याकडे 10 जूनच्या आत आणून द्यावे किंवा दिलेल्या व्हाट्सअप मोबाईल क्रमांकावर गुणपत्रिका पाठवावी.
अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रे तसेच वाचनीय पुस्तके भेट देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल.सत्काराची तारीख नंतर कळविली जाईल.
संबंधित गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची सत्यप्रत पाठवावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या (उत्तर ) वतीने करण्यात येत आहे.
प्रा. गौतम डांगे.
सरचिटणीस









