पाणी सोडण्यापूर्वी दिना डॅमच्या सर्व कालव्यांची दुरुस्ती करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे दिना प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

95
  1. आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्येक्षेखाली चामोर्शी येथे बैठक संपन्न

 

५० कोटींच्या मंजूर निधीचे नियोजन करून प्रस्ताव पाठवा, पुढील वर्षी डबल फसलचे नियोजन करा, ४.५ कोटींच्या कामांच्या चौकशीचे निर्देश

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

दिनांक १ ऑगस्ट चामोर्शी

दिना डॅमच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी सोडण्यापूर्वी या प्रकल्पाच्या २८ कालव्यांची दुरुस्ती करून पाणी सोडण्यात यावे असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिना प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली दिना प्रकल्प निरीक्षण गृह चामोर्शी येथे झालेल्या बैठकीला उपविभागीय अभियंता महीपाल मेश्राम, शाखा अधिकारी समीर दुर्गे, विकास दूधबावरे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, त्रियुगी नारायण दुबे, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, तालुका महामंत्री काशिनाथ बुरांडे, राजेश्वर चुधरी, लोमेश सातपुते, राजू धोडरे, डोमदेव वन्नेवार, उमेश पिटाले, विलास चारडूके, यशवंत त्रिकांडे, चामोर्शी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

 

या प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण कामांसाठी आपण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ती कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी जी कामे योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या संदर्भात असणाऱ्या सर्व कामांचे प्रस्ताव तातडीने नियोजित करून सादर करावे असे निर्देश दिले. सोबतच पुढील वर्षी या प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना डबल फसलचे उत्पादन कसे घेता येईल या संदर्भातही नियोजन करावे अशीही सूचना त्यांनी या बैठकीच्या प्रसंगी दिली.