पोलिसांनी एक लाखाच्या दारूसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

114

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अहेरी, ता. २९ : येथील पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी अहेरीजवळील भुजंगराव पेठा येथे कारवाई करत एक लाखाच्या दारूसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार अहेरीजवळील भुजंगराव पेठा मार्गे दारूची खेप येणार असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना मिळाली. वाघमोडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सापळा रचून भुजंगराव पेठा येथे मारूती सुझुकी क्रमांक एम एच 43 ए एन 5200 ची तपासणी केली असता त्यात रॉयल स्टॅग कंपनीचे 70,800 रु चे 59 नग,रॉयल स्टॅगचे 23,800 रुपयांचे 78 नग व देशी दारू रॉकेट संत्रा 6,400 किमतीचे 80 नग व अडीच लाख रुपये किमितीची कार असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी श्रीनिवास नरहरी वय 35,अतिक अहमद वय 32 दोघे राहणार बाबुपेठ, चंद्रपूर, यांना ताब्यात घेतले असून राहुल मेडी वय 45 हा आरोपी पोलिसांना पाहिजे असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अतिरीक्त पोलिस अधीक्षक (अभियान) एम रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश वाळवी, पोलिस निरीक्षक मोहन तुलावी करत आहेत.

———————————-