ट्रक आणि कारची जबर धडक, एक ठार तीन जखमी

138
ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ८ : चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी गार्गावरील जामगिरीजवळ बुधवार (ता. ८) दुपारी ३.३० वाजता कार आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षका विनोद कुमरे (वय ५७) यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.
जखमी झालेल्यांमध्ये अमोल देशपांडे (वय ४०), कुणाल मुळके (वय २८, रा. कोटगल, ता. गडचिरोली) आणि योगेश वरखडे (वय ४८. रा. नागपूर) याचा समावेश आहे. विनोद कुमरे है या तिघांसह कार (एमएच ०२ बीआर ४९९९) ने आष्टीहून गडचिरोलीकडे परतत होते, तर ट्रक (एमएच ३४ बीडीड-१३३०) चामोर्शीकडून आष्टीकडे जात होता. जामगिरीजवळ भरधाव ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात कुमरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली. इतर तीन जखमींची प्रकृती स्थिर आहे.चामोर्शीचे पोलिस निरीक्षक दीपक डॉब यांनी सांगितले की, ट्रकचालक ताब्यात असून, अपघाताबाबत सखोल तपास सुरू आहे.

 

#BreakingNews #Accident #RoadAccident #FatalAccident #SadNews #TragicAccident #Breaking #Gadchiroli #GadchiroliNews #Chamorshi #Maharashtra #MaharashtraNews #Vidarbha #Nagpur #RoadSafety #DriveSafe #SafeDriving #TrafficAlert #StaySafe #RoadAwareness #NewsUpdate #LatestNews #LocalNews #MarathiNews #BreakingMarathi #NewsAlert #RIP #Condolences #RestInPeace #Tribute #Prayers

—————————————–